breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

हिंजवडी ग्रामपंचायतीचा आदर्श : श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त हद्दीतील मांस-मद्य विक्री पूर्ण बंद!

सरपंच गणेश जांभुळकर यांचा विक्रेते, हॉटेल व्यावसायिकांना आवाहन

पिंपरी | श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्त देशभरामध्ये उत्सव व मंगलमय वातावरण आहे. तसाच उत्सव ‘आयटी हब’ हिंजवडी गावात साजरा होणार असून, या निमित्त गावच्या हद्दीतील सर्व मांस व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावीत, अशा सूचना हिंजवडी ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.

हिंजवडी गावचे सरपंच गणेश जांभुळकर यांनी याबाबत सर्व व्यावसायिक, दुकानदार आणि हॉटेलमालकांना जाहीर सूचना केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यामुळे देशभरात उत्सव साजरा होत आहे. तसेच, हिंजवडीतील श्रीराम मंदिरामध्येही मोठा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

हेही वाचा    –    हिंजवडीमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ विकासकामे! 

त्यामुळे गावात कोणत्याही प्रकारचे मटण, चिकन व मच्छी तसेच देशी व विदेशी मद्य (दारु) विक्री करण्यास बंदी केली आहे. आपण आपली मटण, चिकण, मच्छी विक्री दुकाने, चायनिज दुकाने, मांसाहारी हॉटेल अथवा धाबा, मद्य (दारु) दुकाने मालकांनी कोणत्याही प्रकारे सुरू न ठेवता संपूर्ण बंद ठेवावी. सर्व विक्रेत्यांनी, दुकानधारकांनी या सूचनेची दखल घेवून श्रीराम उत्सव व ग्रामपंचायत हिंजवडीला सहकार्य करावे.

श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ‘आयटी हब’ हिंजवडी ग्रामपंचायत प्रशासनाने मांस व मद्य विक्री बंदीबाबत घेतलेल्या निर्णयाचे परिसरातील श्रीराम भक्त, हिंदू बांधवांनी स्वागत केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button