breaking-newsआंतरराष्टीय

उत्तर कोरियाचा गेल्या वर्षीचा अणुस्फोट हिरोशिमापेक्षा दहा पट अधिक शक्तिशाली

सिंगापुर – उत्तर कोरियाने गेल्यावर्षी जो शेवटचा अणुस्फोट केला होता तो अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉंम्ब पेक्षा दहा पट अधिक शक्तिशाली होता अशी माहिती संशोधकांना मिळाली आहे. सिंगापुर आणि कॅलेफोर्निया विद्यापीठातील काहीं संशोधकांनी याविषयीची माहिती मिळवून एक अहवाल तयार केला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे.

उत्तर कोरियाने 3 सप्टेंबर 2017 साली माऊंट मतंप भागात भूमीगत स्वरूपात हा अणुस्फोट केला होता. त्यामुळे तेथे 5.2 रिश्‍टर स्केल क्षमतेच्या भूकंपा इतका धमाका झाला होता. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जपान आणि जर्मनीतील रडार इमेजिंग सिस्टीमवर नोंदवल्या गेलेल्या माहितीवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. हा स्फोट जमीनीखाली 400 ते 600 मीटर खोलीवर करण्यात आला.

स्फोटानंतर साडे आठ मिनीटांनी त्या भागात पुन्हा एक भूकंपासारखा धक्का जाणवला होता तो ऑफ्टर शॉकच्या स्वरूपातला होता. या स्फोटासाठी जो बोगदा खणण्यात आला होता त्याचा बराचसा भाग या स्फोटामुळे खचला असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. हा स्फोट छोट्या हायड्रोजन बॉंबचा किंवा फ्युजन स्वरूपाच्या स्वरूपातल्या अणु बॉंबचा असावा असा त्यांचा कयास आहे.

स्फोटानंतर जमीनीच्या तेथील भागावर तीन ते चार मिटर उंचीचा एक डोंगर स्वरूपाचा उंचवटा निर्माण झाला पण आत निर्माण झालेल्या पोकळीनंतर तो डोंगर पुन्हा त्याच भागात खचला असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button