breaking-newsआंतरराष्टीय

बांगलादेशात चेंगराचेंगरीत 10 महिलांचा मृत्यू

ढाका – इफ्तारच्या वस्तू मिळवण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये आणि उष्माघातामुळे बांगलादेशात 10 महिलांचा मृत्यू झाला. बांगलादेशातील चत्तोग्राम गावामध्ये एका मदरशासमोरील मोकळ्या पटांगणामध्ये इफ्तारच्या वस्तूंचे वाटप केले जात होते. या वस्तू मिळवण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. छत्तोग्रामच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली.

एका स्टील फॅक्‍टरीच्या माध्यमातून इफ्तारसाठी साड्या आणि रोख रकमेचे वाटप केले जात होते. सुमारे 35 हजार नागरिक एकत्र जमले होते. यावेळी झालेल्या प्रचंड चेंगराचेंगरीमध्ये 9 महिला जागीच मरण पावल्या. तर रुग्णालयामध्ये नेत असताना आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तर 1 किंवा 2 महिला गर्दीत चेंगराचेंगरीमुळे मरण पावल्याचा अंदाज आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी चत्तोग्रामच्या अतिरिक्‍त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती नियुक्‍त करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button