breaking-newsराष्ट्रिय

भय्यू महाराजांच्या संपत्तीचे रहस्य आता सीए कडून समजणार

इंदूर – अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आता पोलिस त्यांच्या सीएला बोलावण्याची तयारी करत आहेत. महाराजांच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल माहिती जाणण्यासाठी ही तयारी सुरू आहे. भय्यूजी महाराजांचे सीए प्रमोद असून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, महाराजांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याची बाब समोर आलेली आहे. परंतु ती स्पष्ट होण्यासाठी सीएचा जबाब आवश्‍यक आहे. तेच सांगू शकतील की, महाराजांना आर्थिक चणचण होती अथवा नाही. दुसरीकडे, पोलिसांनी भय्यू महाराजांची रिव्हॉल्व्हर, सुसाइड नोटच्या तपासणीसाठी पत्र पाठवलेले आहे.

पोलिसांच्या चौकशीतून कौटुंबिक कलह, मानसिक तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती हे मुख्य कारणे मानण्यात येत आहेत. जवळपास 26 जणांच्या जबाबांनंतर पोलिसांनी कुणालाही आत्महत्येसाठी दोषी मानलेले नाही. महाराजांच्या मानसिक ताणाचे मुख्य कारण दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि कन्या कुहूमधील भांडण असल्याचे आढळले आहे. महाराजांनी सेवाकार्यातून निवृत्ती घेतल्यामुळे दानकर्त्यांची संख्याही रोडावली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button