breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवा ; शाळेसाठी प्राधिकरणाची जागा नाममात्र दराने घ्या – राहूल कलाटे

पिंपरी ( महा ई न्यूज) – महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु केली आहे. चिंचवडच्या पेठ क्रमांक 30 मधील प्राथमिक शाळा क्रमांक एकची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तब्बल प्राधिकरणाला 6 कोटी 17 लाख 53 हजार रुपये मोजावे लागणार आहे. परंतू, शाळेची जागा नाममात्र दराने भाड्याने घेवून ती विकसित करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी केली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आज (बुधवारी) झालेल्या बैठकीत चिंचवड पेठ क्र. ३०, प्राथमिक शाळा क्र.१ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस हस्तांतरित करण्याचा विषय क्र.१२ मंजूर करण्यात आलेला आहे. याविषयी कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले असून याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

त्या दिलेल्या पत्रात म्हटले की, चिंचवड गावातील शाळा महापालिकेने पालक व विद्यार्थ्यांचा विरोध असताना पोलीस आयुक्तालयास दिली, तेथील विद्यार्थी नव्याने बांधण्यात आलेल्या दळवीनगरच्या शाळेत स्थलांतरित केले. तेथून जवळच असणाऱ्या शाळेची जागा प्राधिकरणातून महापालिका विकत घेत आहेत. त्यासाठी प्राधिकरणाला मनपाकडून तब्बल ६,१७,५३००० रुपये जागेच्या किंमतीपायी देण्याचा विषय स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

याबाबत शिक्षण विभागातील अधिका-यांना कसलीही माहिती नाही. वास्तविक महापालिका आयुक्त स्थायी समिती बैठकीला उपस्थित नसताना चर्चा न करता एवढा महत्वाचा विषय कसा काय मंजूर केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मनपा अॅमिनिटी व ओपन स्पेस प्राधिकरणाकडून नाममात्र दराने विकसित करण्यासाठी घेत आहोत. शाळा ही देखील एक अॅमिनिटी असल्याकारणाने हि जागा पण आपण नाममात्र दराने घ्यावी.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. म्हणून कोट्यावधी रुपयांचे भूखंड घेणे योग्य आहे का ? किंबहुना, हा खटाटोप केवळ मिळालेल्या भूखंडावर इमारत बांधून ठेकेदार पोसण्यासाठी तर नाही ना ! हि शंका निर्माण होत आहे. याच पद्धतीने कामकाज चालू राहिल्यास भविष्यात नागरिकांना पश्चाताप सहन करावा लागेल, त्यामुळे या प्रकरणी आपण लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button