breaking-newsआंतरराष्टीय

ईदनिमित्त तालिबान आणि अफगाण सैन्याची गळाभेट आणि सेल्फी

बाती कोट (अफगाणिस्तान) – ईदनिमित्त अफगाणिस्तान सरकारने तालिबानबरोबरच्या शस्त्रसंधीचा परिणाम म्हणून आज तालिबानी आणि अफगाणी सैनिकांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि सेल्फीही काढल्या. ग्रेनेड लॉंचर आणि रॉकेट रायफली घेतलेले तालिबानी दहशतवादी कार आणि मोटरबाईकवरून नानगरहार प्रांतातील बाती कोट जिल्हामध्ये आले त्यांच्या हातात तालिबान आणि अफगाणिस्तानचे दोन्ही झेंडे होते.

चेकपोस्टवर अफगाणी सैनिकांनी तालिबानींना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि एकत्र फोटोही काढले. नेहमी एकमेकांच्या जीवावर उठलेले हे दोघेही एकत्र गळाभेट घेतील, असा कोणी विचारही केला नव्हता. अनेक ठिकाणी गावकऱ्यांनीही तालिबान्यांना गळाभेट दिली आणि त्यांच्यासह सेल्फी घेतले. या शस्त्रसंधीचे तालिबानने स्वागत केले. तालिबानींबरोबरच्या या मैत्रीपूर्ण भेटीचे सेल्फी अफगाण सरकारने सोशल मिडीयावरही प्रसिद्ध केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button