breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

कचरा समस्या सोडवण्यासाठी उपक्रम, एकता ग्रावविकास संस्थेचा पुढाकार

सोसायटीधारकांनी सहभागी होण्याची आवाहन

सोसायटीधारकांनी सहभागी होण्याची आवाहन

पिंपरी । महाईन्यूज। विशेष प्रतिनिधी ।

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 2 ऑक्टोबर पासून स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मोठ्या हौसिंग सोसायटीकडून ओला कचरा उचलणे बंद केले जाणार आहे. सोसायट्यांनी ओला कचरा, सुका कचरा असे कचऱ्याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी असे सूचित केले आहे. कचऱ्याची विल्वेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर बनला असून त्यावर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता लोकसहभाग महत्वाचा असून एकता ग्रामविकास संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना लोकांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

75 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायटया, गृहसंस्था तसेच प्रतिदिन 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो, अशा सोसायट्यांचा कचरा घेणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंद केले आहे. पूर्वीसारखे महापालिकेचे आरोग्य विभागातील कर्मचारी / कचरा वेचक हा कचरा उचलण्यासाठी सोसायट्यांमध्ये येणार नाहीत. सोसायट्यांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.
महापालिका हदीतील गूहरचना सोसायट्या, घरगुती कचरा याचे संकलन, घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची स्वतंत्र यंत्रणा, आधुनिक तंत्रज्ञानावरील घनकचरा व्यवस्थापन अशा प्रकल्पांच्या उभारणीपासून ते प्रकल्पातून तयार होणाऱ्या उत्पादनाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची पर्यायी व्यवस्था कशी असावी यावर संस्थेच्यावतीने संशोधनात्मक कार्य सुरू आहे. उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करावी याचे योग्य प्रकारे सोसायट्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

शहरातील विविध खासगी सोसायट्या, सरकारी गृहसंस्था, तसेच दुकाने, हॉटेल्स, शाळा, बँका यांच्याकरिता संस्थेच्यावतीने सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपले शहर, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. याची जाणीव ठेवून आपापल्या सोसायट्यांमध्ये एकता ग्रामविकास संस्थेच्या सहकार्याने कचरा विल्हेवाटीची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करावी. आपणास योग्य ते मार्गदर्शन व प्रकल्प उभारणीसाठी सहाय्य देण्यास संस्था कटीबद्ध राहिल. सोसायट्यांचे अध्यक्ष वा इतर पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रमुख, संचालक यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button