breaking-newsआंतरराष्टीय

इराणची तेलनिर्यात रोखण्याचा अमेरिकेचा प्रयत्न दिवास्वप्न – रुहानी

जिनिव्हा – इराणची तेल निर्यात रोखण्याचा अमेरिकेचा प्रयत्न म्हणजे दिवास्वप्न आहे, असे इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी म्हटले आहे. इराण अणू करारासाठी युरोपिय देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी रुहानी युरोपच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यादरम्यान त्यांनी अमेरिकेवर ही टीका केली.

इराणला क्रूड तेलाच्या विक्रीतून मिळणारा महसूल बंद करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे. इराणशी व्यवहार तोडावेत यासाठी ट्रम्प यांच्याकडून अन्य देशांवर दबाव तंत्राचा अवलंब केला जात आहे. मात्र ही अतिशयोक्तीपूर्ण चाल कधीही यशस्वी होणार नाही, असे रूहानी यांनी बर्न शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ट्रम्प हे साम्राज्यशाही आणू पहात आहेत.

मात्र हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे. अत्यंत बिनबुडाचे दिवास्वप्न ट्रम्प पहात आहेत. इराण व्यतिरिक्‍त क्रूड उत्पादन करणाऱ्या अन्य सर्व देशांना निर्यातीची परवानगी देणे हे अन्याय्य आहे, असेही रूहानी म्हणाले.
इराणकडून तेल खरेदी करण्याची आवश्‍यकता जगाला भासणार नाही.

सौदी अरेबियाने आपले तेल उत्पादन वाढवावे यासाठी आपण पाठपुरावा केला असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणबरोबरच्या अणू करारातून अमेरिकेने माघार घेतली असली तरी आंतरराष्ट्रीय समुदायाने अजूनही या कराराला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button