breaking-newsराष्ट्रिय

इंधनाची मागणी एप्रिल महिन्यात 4.4 टक्‍क्‍यांनी वाढली

नवी दिल्ली – भारतात इंधनाच्या मागणीत एप्रिल महिन्यात 4.4 टक्के इतकी वाढ झाल्याचे आढळून आले आहे. तेल मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एपिल महिन्यातील इंधनाचा एकूण वापर 17.67 दशलक्ष टन इतका होता. गेल्या वर्षी याच महिन्यात हे प्रमाण 16.91 दशलक्ष टन इतके होते. यात पेट्रोलच्या वाढीचे प्रमाण 9.2 टक्के इतके तर डिझेलच्या वाढीचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे.

विमानासाठी लागणाऱ्या इंधनाची विक्रीही एप्रिल महिन्यात 13.4 टक्‍क्‍यांनी वाढली. एलपीजी गॅस विक्री या महिन्यात 13 टक्‍क्‍यांनी वाढून ती 1.87 दशलक्ष टन इतकी झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत केरोसिनच्या विक्रीचे प्रमाण मात्र 7.2 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. नॅप्थाच्या विक्रीचे प्रमाणही या काळात 6.2 टक्‍क्‍यांनी वाढले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button