breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्ध्यातील सभेतून ‘धनुष्यबाण’ गुल, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे फोटोसमोर कमळाचे फूल

वर्धा : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा सोमवारी वर्ध्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. पण या पहिल्याच सभेत भाजपने शिवसेनेला ‘फूल’ बनवले आहे. सभे निमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये केवळ भाजपाची कमळ निशाणी छापण्यात आली असून यातून शिवसेनेची धनुष्यबाण निशाणीच गायब आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान तथा भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली जाहिर सभा वर्धा येथे पार पडली.

यावेळी प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे पोस्टर लावण्यात आले असून पोस्टरमध्ये केवळ कमळचे चिन्ह दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button