breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

इंदोरीकर महाराज यांचे समर्थन मी करत नाही – चंद्रकांत पाटील

मुंबई | महाईन्यूज

इंदोरीकर महाराज हे दिवसाला 80 कीर्तने करतात. समाजातील काही घटनांवर ते मार्मिकपणे टीका ही करतात. असे असले तरी, इंदोरीकर महाराज यांचे समर्थन मी करत नाही. त्यांनी असं म्हणायला नको होतं. पण ते जनप्रबोधन करतात, त्यातलं एखाद्या वाक्यावर इतका वाद ? होणं अपेक्षीत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. गुन्हेगारीने डोके वर काढले आहे, शेतक-यांना अद्याप फायदा झाला नाही, अशा अनेक मुद्यांवर महाविकासआघाडी सरकारच्या विरोधात भाजप 25 फेब्रुवारीला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालायांसमोर धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावेळी ते बोलत होते.

भाजप हा लोकशाही मार्गाने चालणारा पक्ष आहे. ‘सामना’मध्ये छापून आले, ते गुजरातबद्दल बोलतात, तुम्ही मुंबई महापालिकेचं बोला, पावसाळ्यात पाणी भरते त्यावर बोला, ते का लपवून ठेवता ? छापताना थोडं तरी विचार करा. गुजरात राहू द्या आधी मुंबईचं बघा. इथले पैसे जातात कुठे ? आम्हाला ‘सामना’च्या सर्टीफिकेटची काडीची गरज नाही. पाऊस पडला की मुंबई तुंबते त्याचं आधी काय करायचं ते बोला ? असा सवाल त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button