breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रोत येणार ‘बायोडायजेस्टर तंत्रज्ञान’

पाण्याची होणार बचत; पुणे मेट्रो आणि डी.आर.डी.ओ संस्थांचा सामंजस्य करार

पुणे | प्रतिनिधी

पुणे मेट्रोच्या स्थानकांमधील स्वच्छतागृहे, पिण्याचे आणि वापराचे पाणी संवर्धन करण्यासाठी ‘बायोडायजेस्टर’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. या संदर्भात करारावर पुणे मेट्रो आणि डी.आर.डी.ओ संस्थांचा सामंजस्य करार संपन्न झाला.याप्रसंगी अतुल गाडगीळ (संचालक, प्रकल्प) आणि डॉ. डी. के. दुबे (संचालक, डीआरडी) यांच्यामध्ये संयुक्त करारावर स्वाक्षरी करण्यात आली. करारासंबंधीचे दस्तऐवज डॉ. ब्रिजेश दीक्षित (व्यवस्थापकीय संचालक महामेट्रो) व डॉ. एच. के. सिंग (डायरेक्टर जनरल डीआरडीओ) यांच्यामध्ये देवाण घेवाण करण्यात आली.

डीआरडीइ आणि डीआरडीओ या संस्थांनी बायोडायजेस्टर तंत्रज्ञान विकसित केले आहे. सध्या या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सैन्यदल आणि रेल्वेमध्ये होत आहे. बायोडायजेस्टर तंत्रज्ञान वापरण्यास अत्यंत सुलभ असून त्याला कमीत कमी देखभालीची गरज पडते. या तंत्रज्ञानाचा वापर पुणे मेट्रो स्थानकांवर केला जाणार आहे. सध्या पुणे मेट्रोचे काम प्रगती पथावर असून आतापर्यंत 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोमध्ये वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या 2 मार्गिकेंमध्ये 31 स्थानके आहेत. पुणे मेट्रोच्या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी लिफ्ट, एस्केलेटर, पिण्याचे पाणी, इन्फॉर्मेशन डिस्प्ले व स्वच्छतागृहे सुविधा उपलब्ध असणार आहेत. पुणे मेट्रोची स्थानके आयजीबीसी ग्रीन बिल्डिंगच्या मार्गदर्शक तत्त्वाद्वारे बनविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक पर्यावरण संवर्धन तंत्रज्ञानाचा स्टेशन उभारणीत समावेश करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया –

बायोडायजेस्टर तंत्रज्ञानसंबंधी करारामुळे पुणे मेट्रोला आपली पर्यावरण पूरक बांधिलकी जपण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे. पुणे मेट्रो नेहमीच पर्यावरण संवर्धनाची भूमिका घेत आली आहे. झाडांचे पुनर्रोपण, सोलर विद्युत पॅनलचा वापर, मेट्रो स्थानकांमध्ये कमीत कमी विजेचा वापर, बायोडायजेस्टर इत्यादी पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर मेट्रो उभारणीत करण्यात येत आहे. यामुळे पुणे मेट्रोच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकलपनेला बळ मिळणार आहे. पुणे मेट्रो ही आदर्श पर्यावरण पूरक मेट्रो म्हणून भविष्यात नावारुपाला येईल. त्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, पुणे मेट्रो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button