breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंदिरा शैक्षणिक समूहाच्या वतीेने वृक्षलागवड

पिंपरी ( महा ई न्यूज ) – ताथवडे येथील इंदिरा शैक्षणिक समुहाने यशस्वीपणे 25 व्या वर्षात पर्दापण केल्याने अडीच हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.  हे वृक्षारोपण खानापूर, बेलवडे, गो-हे, गाऊडदरा आणि श्रीरामनगर या ग्रामपंचायतीच्या हद्दीत करण्यात आले. यावेळी इंदिरा शैक्षणिक समुहाच्या प्रमुख डाॅ. तरीता शंकर आणि विश्वस्त, समुह संचालक चेतन वाकलकर यांच्या शुभहस्ते श्रीरामनगरमध्ये उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास आदेश गायकवाड, संदीप गायकवाड, डाॅ. अनघा जोशी, गिरीष पारीख, डाॅ. जनार्दन पवार उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक संतोषकुमार आणि प्रा. रेज्जी थाॅमस यांचे हस्ते गो-हे गावात वृक्षारोपण करण्यात आले. 

या उपक्रमार्तंगत अर्जुन, हिरडा, बेहडा, पांगारा, शिवण, कवठं, फणस, जांभूळ, आंबा, आपटा, पेरु, उंबर, पिंपळ, चाफा, तुळस, जास्वंद इत्यादी स्थानिक जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमास पुणे येथील लायन्स क्लबचे रघुनाथ ढोले, श्रीरामनगर सरपंच मनिषा नावडकर, गाउडदरा सरपंच जयश्री आेव्हाड, खानापूर सरपंच शरद जावळकर, सरपंच लहू खिरीड, उपसरपंच गो-हे मुक्ताबाई खिरीड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी इंदिरा महाविद्यालयातील प्रा. अविनाश शिंगटे, प्रा. सुमित ससाणे, प्रा. रत्ना मोरे, डाॅ. चंद्रशेखर पवार, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विशेष श्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button