breaking-newsमनोरंजन

ओळखा पाहू हा बॉलिवूड अभिनेता कोण?

सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्याचा कॉलेजमधील ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमधील अभिनेत्याला ओळखणे थोडे कठिण झाले आहे. चाहत्यांनी हा अभिनेता वरुण धवन, रणवीर सिंग असल्याचे वाटत होते. परंतु हा अभिनेता म्हणजे बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका आणि आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख बनवणारा कार्तिक आर्यन आहे.

कार्तिकने नुकताच इम्तियाज अली यांच्या ‘लव आज कल २’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या चित्रपटात कार्तिकसह अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान कार्तिकचा कॉलेजमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहता कार्तिकला ओळखणे कठीण झाले आहे. या फोटोमध्ये कार्तिकने जॅकेट परिधान केले असून हा ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो आहे.

सध्या कार्तिक ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लखनऊला रवाना झाला आहे. या चित्रपटात कार्तिकसह अभिनेत्री भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १९८७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पती,पत्नी और वो’ चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असून त्याला विनोदाची किनार होती. या कारणास्तव हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये संजीव कुमार, विद्या सिन्हा, रंजीता कौर हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने मुदस्सर अजीज यांनी रिमेक करण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाचा मूळ आशय तोच ठेऊन यामध्ये मॉर्डन ट्विस्ट करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने भूमि, अन्यना आणि कार्तिक हे त्रिकूट पहिल्यांदा काम करत आहेत. हा चित्रपट जानेवारी २०२०मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button