breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

इंडिगो एअरलाइन्समधील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

चेन्नई | सफाई कर्मचारी, पोलीस, डॉक्टरांनंतर आता हवाई क्षेत्रातही कोरोना व्हायरसनं घुसखोरी केली आहे. इंडिगो एअरलाईन्समधील (Indigo Airlines) एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

या कर्मचाऱ्याचं वय साधारण 55 ते 60 असावं. हा कर्मचारी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर होता. मृत्यूनंतर आलेल्या रिपोर्टमध्ये हा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. एअरलाईन्समध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला हा पहिला रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे. एअरलाईन्समध्ये कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांची जबाबदारी इंडिगो कंपनी घेणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. हवाई क्षेत्रात विमान सेवा देणाऱ्या कंपन्यांपैकी ही पहिली केस असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या कर्मचाऱ्याच्या संपर्कात आणखीन कोण आलं होतं का? याची तपासणी केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button