breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 19,681 रुग्णांचा मृत्यू

वॉशिंग्टन | कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जगभरात लोखो लोक कोरोना व्हायरसवर उपचार घेत आहेत. तर जवळपास 1 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकेनं इटलीचा रेकॉर्ड तोडला आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत सर्वात जास्त मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.

एका न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार 24 तासांमध्ये 1 हजार 920 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत आतापर्यंत मृत्यूचा आकडा जवळपास 20 हजारच्या आसपास पोहोचला आहे. त्यापाठोपाठ इटली 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्पेन आणि फ्रान्सचा क्रमांक आहे. अमेरिकेत व्हायरमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button