breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी रुग्णालयास नगरसेवक दत्ताकाका साने यांचे नाव द्या

विरोधी पक्षनेते नाना काटे यांची आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

भोसरी येथील कोविड-19 सेंटरच्या रुग्णालयास माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक दत्ताकाका साने यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना काटे यांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने हे सक्रिय नगरसेवक होते. जनतेच्या कामासाठी ते नेहमी अग्रेसर असत. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी हजारो नागरीकांना मदत केली. मदत करत असतानाच त्यांना कोरोना झाला व त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

चिखली परीसरच नव्हे तर संपूर्ण शहराच्या विकासाबाबत नेहमी जागरुक असत, विशेषत: भोसरी विधानसभा संघाकडे त्याचे लक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कार्यांची कायमस्वरुपी ओळख राहण्यासाठी पालिकेच्या भोसरी येथील नव्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयास दत्ताकाका साने यांचे नाव दिल्यास हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. याबाबत पालिकेच्या प्रकल्पास त्यांचे नाव देण्याबाबत सर्व पक्षीय सदस्यांनी सभागृहात देखील मागणी केली आहे. त्यामुळे भोसरी येथील नव्याने बांधण्यात आलेले मनपाचे सर्व सोयीनीयुक्त अशा रुग्णालयास स्व.दत्ताकाका साने यांचे नाव देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.

   
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button