breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आरोग्यदायी आयुष्यासाठी सायकल शेअरींगचा वापर करा; महापौर राहूल जाधव यांचे आवाहन

पिंपरी – प्रदुषणमुक्त शहर आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी सर्वांनी सायकल शेअरींगचा वापर करावा, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले.

 

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट अंतर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव सायकल चालवून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कुंजीर क्रीडांगण पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमास आयुक्त तथा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमीटेडचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे, विठ्ठल काटे, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गटूवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, इलू बाइक्स कंपनेच सुनिल जालीहाल व रितेश राठोड आदी उपस्थित होते.

 

यावेळी कुंजीर क्रीडांगण कुणाल आयकॉन रोड पिंपळे सौदागर ते राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरवपर्यंत सायकल शेअरींगमध्ये आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक सचिन चिखले, नगरसदस्य विठ्ठल काटे, माजी नगरसदस्य विजय लांडे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आदी मान्यवरांनी सायकल चालवून या मोहमेत सहभाग घेतला.

महापौर राहुल जाधव म्हणाले की, शहराच्या नावलौकीकमध्ये या प्रकल्पामुळे भर पडणार असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येला आळा बसेल व नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

 

श्रावण हर्डीकर म्हणाले की, अल्प कालावधीत शहराचा स्मार्ट सिटी आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला. याकामी लोकप्रतिनिधी, प्रशासन व शहरातील नागरिक यांची फार मोठया प्रमाणात मदत झालेली आहे. नागरिकांना दैनंदीन जीवनातील त्रास कमी व्हावा, त्यांचे जीवण सुखकर व्हावे, यासाठी चांगल्या योजना निर्माण करण्याचा उददेश या स्मार्ट सिटी मध्ये आहे. भविष्यातील नियोजन लक्षात घेता टप्या टप्याने हे शहर स्मार्ट व सुदंर करण्या करीता सर्वांनी सहकार्य करावे, भविष्यात सार्वजनिक वाहतूक सुविधेला सक्षम करावे लागेल. पादचा-यासाठी फुटपाथ सुविधेबाबत व सायकल स्वारांसाठी सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आलेले आहे. प्रायोगिक तत्वार ३४ ठिकाणी सायकल शेअरींग उभारण्यारत येणार असून किफायतशिर दर व ऑफरचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

या योजनेचा लाभ ३१ ऑगस्ट २०१८ अखेर सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना घेता येईल. एका महिन्यामध्ये इलू ३० अंतर्गत १०० रुपयांमध्ये ३० फे-या घेता येतील व यापुढे दर अर्धा तासाला रक्कम रुपये ५ असतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर, आभार नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी मानले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button