breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आरसेप’ करारात सहभागी न होण्याच्या पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्यावतीने स्वागत 

पिंपरी |महाईन्यूज|

क्षेत्रीय सर्वसमावेशक आर्थिक भागिदारी अर्थात ‘आरसेप ‘ करारात सहभागी न होण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी बँकॉक येथे भरलेल्या ‘रिसेप ‘ शिखर परिषदेत जाहिर केला. हा निर्णय देशाच्या हिताचा असून नैशनल हॉकर्स फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघातर्फे या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशा शब्दांत महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केले.

यावेळी राज्य समन्वयक मेकंजी डाबरे, उपाध्यक्ष  जिवन कदम ,  कार्याध्यक्ष राजु बिराजदार ,संघटक अनिल बारावकर ,बालाजी इंगळे ,धर्मेंद्र पवार, सुखदेव कांबळे, इरफान चौधरी, पोपट पानसरे ,पंडीत  कांबळे, यांचेसह विविध  कामगार उपस्थित होते. या करारात सहभागी झाल्यास देशात अनेक विपरीत परिणाम होणार होते, ते सध्या तरी टळले आहेत.

यावेळी नखाते म्हणाले ” भारतात सध्याची परिस्थिती आर्थिक मंदी असून अनेक उद्योग व्यवसाय डबघाईला आले आहेत. नोटा बंदी, जी.एस.टी. च्या पार्श्वभुमीवर औद्योगिक क्षेत्रात, विशेषता वाहन, बांधकाम क्षेत्रात मंदी आहे, कृषी क्षेत्र आणि त्यावर अवलंबून असणारे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आहेत. देशाची अर्थव्यवस्था पहाता गेल्या तिमाहीमध्ये सलग पाच वेळा’ जीडीपी ‘ची घसरण होत आहे ‘

आरेसप ‘ मध्ये ज्या विविध देशासोबत करार होणार होता. त्यांच्या सोबत वीस टक्के निर्यात आणी पस्तीस टक्के आयात असा उलटा करार होता. मुळात देशातील कारखाने, उत्पादक आणी कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेऊन इथल्या बाजारपेठेला उर्जित अवस्था देणे गरजेचे आहे. ते  पुढील काळात अपेक्षीत आहे. पंतप्रधानानी हा निर्णय घेऊन भारताने नक्कीच देशातील बाजारपेठेच्या हिताचे रक्षण केले आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button