breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्थायी’च्या सभेला दांडी मारणा-या अधिका-यांना नोटीस काढणार, प्रशासन विभागाला सूचना

रजा घेतलेल्यांना सवलत, मात्र दांडी बहाद्दूरांना कारवाईचा बडगा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कित्येक वरिष्ठ व कनिष्ठ अधिका-यांनी आज (बुधवार) झालेल्या स्थायी समितीच्या सभेला दांडी मारली. मात्र, अनेकांनी रजा न घेताच गैरहजर राहिल्याची बाब दिसून आली आहे. त्यामुळे त्या अधिका-यांना प्रशासन विभागाकडून नोटीस काढून खुलासा मागवण्यात येणार आहे. यामुळे कामा असूनही स्थायी सभेकडे पाठ करणा-यावर लवकरच कारवाई बडगा उगारण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती तब्बल दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर पहिल्यांदाच सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. तसेच अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्यासह काही विभाग प्रमुख उपस्थित होते.

स्थायी समितीची एकूण तीन तहकूब सभा घेण्यात आल्या. या सभेला अनेक वरिष्ठ-कनिष्ठ अधिका-यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे स्थायी समितीला कामकाजाला अडथळा झाला होता. वरिष्ठ अधिकारी गैरहजर असल्याने त्या-त्या विषयाची माहिती काहींना देता आलेली नाही. यामुळेच रजा घेवून सुट्टीवर गेलेल्यांना सवलत द्यावी, मात्र, कामावर असताना अथवा रजा न घेता स्थायी सभेला गैरहजर राहिलेल्यांना नोटीस काढून त्याचा खुलासा मागवावा, अशा सुचना स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनोज लोणकर यांना दिल्या आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button