breaking-newsमनोरंजन

आरके स्टुडिओची होणार विक्री

 

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या आणि अनेक गाजलेल्या व उत्कृष्ठ चित्रपटांचा साक्षीदार असलेला आर. के. स्टुडिओ इतिहासजमा होणार आहे. राज कूपर यांच्या मुलांनी म्हणजेच कपूर भावंडांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. स्टुडिओतून मिळणारे उत्पन्न तुलनेने कमी असून त्याच्या देखभालीसाठी होणारा खर्चच जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते.

या वृत्ताला अभिनेते ऋषी कपूर यांनी दुजोरा दिला. आर. के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहीत केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले होते. आता तो पुन्हा उभा करणे शक्‍य नाही. आता हा स्टुडिओ विकणे योग्य ठरेल, असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला, असे त्यांनी स्पष्ट केले.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबरवर सुपर डान्सर या डान्स रिऍलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. या सेटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि त्यानंतर संपूर्ण स्टेज जळून खाक झाला होता. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागात ही आग पसरली होती. या आगीने अनेक जुन्या आठवणी क्षणात नष्ट झाल्या. याबद्दल ऋषी कपूर यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले होते.

  • आगीत सारेकाही भस्मसात

आवारा, आह, श्री 420 नंतर आलेले जागते रहो, जिस देश मे गंगा बहती है, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, हिना, प्रेम ग्रंथ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे. या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम आर. के. स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले गेले होते. पण आगीत हे सगळे कॉस्च्युम भस्म झाले. आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम येथे संरक्षित ठेवले जात. नरगिसपासून ऐश्वर्या राय-बच्चनने त्यांच्या चित्रपटांत घातलेले पोशाख येथे संग्रहीत करण्यात आले होते. पण ते सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button