breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

२६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांविरोधातील लढ्याचं नेतृत्व करणाऱ्या माजी NSG प्रमुखांचं करोनामुळे निधन

मुंबई |

निवृत्त आयपीएस अधिकारी आणि एनएसजीचे माजी डीजी जे के दत्त यांचं निधन झालं आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यासंबंधी समस्यांमुळे त्यांचं निधन झालं. दिल्लीमधील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. जे के दत्त हे पश्चिम बंगाल केडरमधील १९७१ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी होते.

जे के दत्त यांनी सीबीआय तसंच सीआयएसएफमध्ये अनेक पदांवर काम केलं. सीबीआयमध्ये असताना जे के दत्त यांनी अनेक महत्वाची प्रकरणं हाताळली होती. जे के दत्त यांनी दिल्ली विद्यापीठातून आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यांना पोलीस शौर्य पदक, गुणवंत सेवेसाठी पोलिस पदक आणि विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलं होतं. मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्यात त्यांनी दहशतवाद्यांशी लढा देताना नेतृत्व करत महत्वाची कामगिरी निभावली होती.

वाचा- इमारत जमीनदोस्त करताना अधिकाऱ्यांना मारहाण; गुन्हा दाखल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button