breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘फिजीकल डिस्टनस’ ठेवून भाजीपाला खरेदी करावा- नगरसेवक शितल शिंदे

  • खरेदीला आलेल्या नागरिकांची वैद्यकिय पथक करणार तपासणी 
  • दळवीनगर – चापेकर चौक रस्त्यावर सुरु होणार भाजीपाला विक्री केंद्र 

पिंपरी  – पिंपरी चिंचवड शहरात करोना विषाणू साथीमुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरात जमावबंदी आणि संचारबंदी जवळपास एक महिना उलटून गेलेला आहे. चिंचवड, आकुडीं, स्टेशन परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्याची अडचण भासू नये म्हणून SKF कंपनीसमोरील मैदानावर उद्या (मंगळवारी) सकाळी 10 ते 2 यावेळेस भाजीपाला विक्री केंद्र सुरू ठेवणार आहे. नागरिकांनी फिजीकल डिस्टनस ठेवून भाजीपाला खरेदी करावा. तसेच प्रत्येकाने तोंडाला मास्क वापर करावा असे आवाहन नगरसेवक शितल शिंदे यांनी केले आहे.  

आजपर्यंत 89 करोना बाधित रुग्ण पिंपरी चिंचवड शहर परिसरात आढळले आहेत. करोना साथीचा प्रादुर्भाव पाहता, शासनाकडून लॉकडाऊन अजून वाढणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक साहित्यासाठी नागरिकांची गैरसोय होवु नये म्हणून SKF कंपनीसमोरील मैदानावर ही भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येत आहे.

करोना विषाणूची साथ शहरात दररोज वाढत आहे. यामुळे लॉकडाऊनचा कालावधी अजून वाढण्याची शक्यता आहे. याचा गंभीर परिणाम होत आहेत. लॉकडाऊनमुळे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांची आर्थिक स्थिती संपूर्णपणे खालावली आहे. एक महिन्यापासून सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाऊनमुळे कोणत्याही प्रकारचा व्यापार, उद्योग आणि आर्थिक देवाणघेवाण जवळपास बंद आहे. कामगार नगरीत कामगारांच्या हाताला काम नाही. 

त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत शहरातील नागरिकाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच नागरिकांना स्वच्छ, ताजा आणि स्वस्त शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे आकुडीं, चिंचवड व स्टेशन परिसर, सुदश॔ननगर, श्रीधरनगर, श्रध्दा गाड॔न, लिंकरोड, देवधर सोसायटी,  दळवीनगर, चाफेकर चौक,  जुना जकातनाका या  सव॔ नागरिकांना लाभ होणार आहे.

दरम्यान, भाजीपाला विक्री केंद्रावर येणा-या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक व आरोग्य कम॔चारी तैनात राहणार आहेत. सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला विक्री केंद्राचे स्टाॅल उभारले आहेत. या भाजी विक्रेत्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. उन्हाळा असल्याने प्रत्येकांनी छञी वापर करावा. तर वाहनांचा वापर टाळून पायी येवून भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहनही नगरसेवक शितल शिंदे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button