breaking-newsराष्ट्रिय

आयातीऐवजी ८० लाख टन साखर निर्यात करावी

श्रीरामपूर : चकोमा एक्स्पोर्ट्स या कंपनीने पाकिस्तानातून अवघी ४ हजार ७०० टन साखर आयात केली आहे. आयातीचे हे प्रमाणे नगण्य असले तरी पाकिस्तानबरोबरच्या संबंधांमुळे हा विषय संवेदनशील बनला आहे. दरम्यान, माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांशी साखरे संदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी ८० लाख टन साखरेची सरकारने निर्यात करावी, अशी मागणी करण्यात आली.

पंतप्रधानांचे प्रमुख सचिव नृपेन मिश्रा यांच्यासमोर साखर उद्योगातील समस्या मांडण्यात आल्या. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या दिल्ली येथे निवासस्थानी झालेल्या बैठकीस राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. यंदा व पुढीलवर्षी विक्रमी उत्पादन होणार असून ५ कोटी ऊस उत्पादक व ५३० कारखाने संकटात सापडले आहेत. त्यांना मदतीचा हात न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊन हाताबाहेर जाऊ  शकते, असा इशारा देण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button