breaking-newsपुणे

आयसोबार वर्ल्ड सर्व्हिसेस इंडिया ‘ग्रेट इंडियन वर्कप्लेस अवॉर्ड्स २०१९’ सम्मानित

पुणे | यूबीएस मंचांनी मुंबई येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या कल्चर समिट मध्ये आयसोबार वर्ल्ड सर्व्हिसेस (आयडब्ल्यूएस) इंडियाला “ग्रेट इंडियन वर्कप्लेस” पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपन्यांना तिथे असलेल्या कार्यस्थळाची संस्कृती व पद्धती या निकषावर दिला जातो. हा पुरस्कार मिळवण्यासाठी आयसोबार वर्ल्ड सर्व्हिसेस इंडियाला अनेक निवड प्रक्रियांमधून जावे लागले, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांचे मत व कल्चरल ऑडिट यांचा समावेश होता.

आयसोबार वर्ल्ड सर्व्हिसेस इंडियाला सुरक्षित, काळजी घेणारे आणि काम करण्यासाठी आकर्षक वातावरण यासाठी मान्यता देण्यात आली जिथे कर्मचारी त्यांच्या कामाचा अभिमान बाळगतात, कार्य-आयुष्यातील संतुलन आणि सतत व्यावसायिक वाढीचा आनंद घेतात. निवड निकषांमध्ये कर्मचाऱ्याचे व्यवस्थापन, कंपनीचा विश्वास, कर्मच्याऱ्याना मिळणारे फायदे आणि कार्यसंस्कृती यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या सर्वेक्षणात समाविष्ट केली होती. आयडब्ल्यूएस इंडिया विविधता आणि समावेश, सक्रिय गुंतवणूक, बक्षिसे आणि मान्यता आणि कामगिरी व्यवस्थापन या संदर्भात एचआर पद्धतींमध्ये सातत्याने नाविन्य आणत आहे. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.

· कंपनीच्या प्रमुख निर्णयांमध्ये कर्मचाऱ्यांचा सहभाग

· कामाचे तास

· अंतर्गत संभाषण

· सर्वेक्षणांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचा नियमित अभिप्राय घेणे तसेच वन टू वन मीटिंग

· मूल्य-चलित पुरस्कार आणि मान्यता धोरण

· संस्कृतीच्या आधारस्तंभांवर जोर

· समाजाला परत देण्यासाठी संघटित काम

यावेळी बोलताना आयडब्ल्यूएस इंडियाचे कंट्री हेड श्री शशिकांत शिंपी म्हणाले, “हा पुरस्कार आम्हाला कर्तृत्व आणि अभिमानाने प्रफुल्लित करतो. आयडब्ल्यूएस इंडिया मधील आमचे लक्ष्य हे आमच्या लोकांना आमच्याबरोबर काम करण्यास अधिक आरामदायक आणि आनंदी बनविणे आहे. आमच्या कार्यसंघाला जागतिक स्तरावर आमच्या ग्राहकांना उच्च प्रतीची तंत्रज्ञान सेवा पुरविण्याबरोबरच एक आकर्षक आणि सर्वसमावेशक कामाचे वातावरण तयार करण्याच्या कार्यक्षेत्राचा मला अभिमान आहे. सर्वांसाठी एक उत्तम कार्यस्थान बनविण्यासाठी आमचे प्रयत्न चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button