breaking-newsपुणे

मजूर कर्मचारी, नियोजन शून्य कारभारामुळे कडलासमध्ये पाणी टंचाईच्या झळा !

ग्रामविकास अधिका-यासह गावपुढा-याचे दुल॔क्ष 

सांगोला  – कडलास (ता.सांगोला) येथील ग्रामपंचायतीचे मुजोर कम॔चारी आणि नियोजन शून्य कारभारामुळे कडलास गावासह वाड्या वस्त्यावरील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. पाच-सहा दिवसातुन एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. विशेषतः नव्याने विहिर खोदाई आणि पाणी पुरवठ्यावर लाखो रुपये खच॔ करुनही गावाला पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. याकडे ग्रामविकास अधिका-यासह लोकप्रतिनिधीचे दुल॔क्ष झाले आहे.

सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्या असून, हंडाभर पाण्यासाठीही जीवाचे रान करावे लागत आहे. विशेषतः गावातील अनेक भागात  पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. काही महिन्यांपूर्वी माणनदीत मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता, तरीही पाणी टंंचाई कायम आहे. गावातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात हंडाभर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. दुर्दैवाने पाणीटंचाई कायमची दूर व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने नव्याने विहिर खोदली पण तो खच॔ देखील पाण्यात गेला आहे. ती विहिर देखील कोरडी ठणठणीत पडली आहे.

गावच्या वाड्यावस्त्यांवरील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या ही पाचवीलाच पुजलेली आहे. उन्हाळा असो की पावसाळा पाणी टंचाई कायम आहे. तर उन्हाळा सुरू झाला कित्येक भागातील पाण्याचे स्रोत आटू लागतात. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते अथवा टँकरवर अवलंबून राहावे लागते. नैसर्गिक पाण्याचे स्रोत कमीच आहेत. त्यामुळे गावांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरातील वाड्यावस्त्यांवर पाण्याची टंचाई तीव्रतेने जाणवू लागलेली आहे.

दरम्यान, कडलास ग्रामपंचायतीच्या दोन विहीरी असूनही गावासह वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोटेशननुसार पाच ते सहा दिवसातुन एकदा पाणी पुरवठा केला जातो. तसेच अनेकदा पाणी पुरवठाचा खोळंबा झाल्यावर कोणतेही नियोजन केले जात नाही. याचा फटका गावक-याना बसू लागला आहे. यामध्ये ग्रामपंचायत कम॔चा-याचा निष्काळजी व मुजोरपणा, नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. 

सध्यस्थितीत ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी घेण्यास पञ दिले आहे. परंतु ग्रामपंचायतीचा हा कारभार म्हणजे तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करुन सुरळीत करावा,अशी मागणी नागरिकांतुन होवु लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button