breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘इंद्रायणी थडी’ च्या ‘टायटल साँग’चा सोशल मीडियावर ‘धुरळा’

आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाला नेटिझन्सची पसंती

गीतातून नव्याच्या नवलाईने परंपरेची गुढी उभारण्याचा संकल्प

३० जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२० भोसरीत स्त्री-शक्तीचा जागर

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रातील ‘ब्रँड’ झालेल्या इंद्रायणी थडी जत्रेच्या ‘टायटल साँग’चे नुकतेच अनावरण झाले. या गीताला सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून साकरलेल्या या लक्षवेधी उपक्रमाला नेटिझन्सची पसंती मिळत आहे.

इंद्रायणी थडीच्या माध्यमातून कला, क्रीडा, उद्योजकता यांसह महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात येणार आहे. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर येत्या दि. ३० व ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ही जत्रा भरवण्यात येणार आहे.

संगीतकार, गायक सूहित अभ्यंकर आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ फेम गायिका राजेश्वरी पवार यांनी हे गीत गायले आहे. गीताची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रसाद भेडसगावकर  यांनी केले आहे.  पहिल्याच वर्षी जत्रेला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. त्यानंतर जत्रेच्या दुसऱ्या वर्षी महाराष्ट्रातील सर्वाधिक लक्षवेधी जत्रा आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यामुळे यात्रेचे ‘ब्रँडिंग’ करताना यंदा ‘टायटल साँग’ची निर्मिती केली आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या सौभाग्यती पुजा महेश लांडगे आणि कन्या साक्षी महेश लांडगे यांनी याकामी पुढाकार घेतला आहे. तसेच, शिवांजली सखी मंचच्या सदस्यांनी गेल्या दीड महिन्यांपासून जत्रेच्या नियोजनात सहभाग घेतला आहे. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी यावर्षी जत्रेची ‘थीम’ आहे. पिंपरी-चिंचवड पर्यायाने भोसरीला संत-महात्म्यांचा वारसा आहे. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपतानाच कलाचे आदर आणि नव्याच्या नवलाईने परंपरेची गुढी उभारण्याचा मानस गीतातून व्यक्त करण्यात आला आहे.

‘इंद्रायणी थडी’च्या ‘टायटल साँग’ची यू-ट्यूब लिंक :

****

…असे आहेत गीताचे बोल!

देहू आळंदीजवळ भरली जत्रा अनोखी..

सासू-सुना असतील घरी, इथं मात्र माय-लेकी !

नव्याच्या नवलाईसंगे उभी परंपरेची गुढी,

आली पुन्हा तुमची आमची इंद्रायणी थडी !

सोहळ्याची घडी आली इंद्रायणी थडी

पाटातल्या पान्यावानी, ओठातल्या गाण्यावानी

फेट्यातल्या तुऱ्यावानी, माझी मराठी माऊली

मराठीच्या हो मानाचा, करू उत्सव मोलाचा

शिवरायाच्या देशात, करू जागर कलेचा

गावाकडच्या मातीचा, आला दरवळ दूर

कलागुणांच्या गंगेला, आला आनंदाचा पूर

गणेशाच्या डोई जशी दुर्वेची जुडी

सोहळ्याची घडी आली इंद्रायणी थडी !

कर्तृत्वाला वाचा फुटे माता-भगिनींच्या,

प्रबोधन होय संगे मनोरंजनाच्या

फॅशन संगे संस्कृतीची इथं जमते जोडी

सोहळ्याची घडी आली इंद्रायणी थडी!

मृदंगाच्या तालासंगे पायातली लय,

येता इथं मन पार हारपून जाय

नव्या नव्या चवीची सारे चाखू गोडी,

महेशदादांना साथ वहिनींची घडोघडी,

इंद्रायणी थडी.. इंद्रायणी थडी..!!

————–

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button