breaking-newsमनोरंजन

“आयफा 2018′ मध्ये श्रीदेवी आणि इरफान खान सर्वोत्कृष्ठ अभिनेते

“आयफा 2018’च्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अभिनेता इरफान खानला “हिंदी मिडीयम’साठी आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीला “मॉम’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेते म्हणून गौरवण्यात आले आहे.

बॅंकॉकमधील सियाम मिरानित थिएटरमध्ये रविवारी झालेल्या रंगतदार समारंभामध्ये “तुम्हारी सुलू’ला सर्वोत्कृष्ठ सिनेमा म्हणून गौरवण्यात आले आहे. तर “हिंदी मिडीयम’च्या डायरेक्‍शनसाठी साकेत चौधरीला सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शकाच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले.

श्रीदेवीच्यावतीने बोनी कपूरनी पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना ते थोडे भावुक झाल्याचे दिसून येत होते. हा पुरस्कार “मॉम’च्या पूर्ण टीमला समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले. याच पुरस्कार समारंभामध्ये दिवंगत अभिनेते विनोद खन्ना, शशी कपूर आणि श्रीदेवीला सन्मानित केले गेले.

विनोद खन्नाला दिलेला पुरस्कार प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी तर शशी कपूर यांच्यासाठीचा पुरस्कार ऋषी कपूर यांनी स्वीकारला. या समारंभात वरुण धवनने “तम्मा तम्मा’ आणि रणबीर कपूरने “बलम पिचकारी’सारख्या गाण्यांवर धमाकेदार परफॉर्मन्स केले. बॉबी देओल, युलिया युंतूर, अर्जुन कपूर, कृति सेनन आणि श्रद्धा कपूरनीही जबरदस्त परफॉर्मन्स केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button