breaking-newsराष्ट्रिय

आयआरटीसी प्रकरण : राबडी देवी, तेजस्वी यादव यांना न्यायालयाचा दिलासा

नवी दिल्ली – आयआरटीसी घोटाळा प्रकरणी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पतियाळा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यासह अन्य आरोपींचाही जामीन मंजूर झाला आहे. दिल्लीच्या पतियाळा न्यायालयाने आरोपींना एक लाख अनामत रक्कमेवर जामीन दिला आहे. या सुनावणीवेळी लालू प्रसाद यादव हजर नसल्याने त्यांना जामीन नाकारण्यात आला आहे.

आयआरटीसी घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून न्यायालयात आरोपपत्र न्यालयात दाखल झाल्यांनतर राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यासह अन्य आरोपींना ३१ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी समन्स पाठविण्यात आला होता. या घोटाळ्यामध्ये तेजस्वी यादव, राबडी देवीसह जेडीयू नेते पीसी गुप्ता, सरला गुप्ता, लारा प्रॉजेक्‍ट या कंपनीचे दहा भागीदार व अधिकारी यांचीही नावे सामील आहेत. या सर्वाना आजच्या सुनावणी वेळी १ लाख रुपये अमानत रक्कम भरून जामीन मंजूर करण्यात आला. लालू प्रसाद यादव यांनी काल रांची न्यायालयासमोर शरण आल्याने ते आजच्या सुनावणी दरम्यान हजर राहू शकले नाही. तर सीबीआयच्या याचिकेवरून लालूंना न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी प्रॉडक्शन वारंट जारी केले आहे.

काय आहे प्रकरण –

आयआरसीटीच्या मालकीची पुरी आणि रांची येथील दोन हॉटेल्स एका खासगी कंपनीला लीज वर देताना त्यात भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही हॉटेल्स लीजवर दिल्या प्रकरणी त्याचा मोबदला म्हणून पाटण्यातील एक भूखंड राजदचे नेते पी सी गुप्ता यांच्या कंपनीला देण्यात आला. नंतर हा भूखंड हळूहळू राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्या नावावर वर्ग करण्यात आला. ही जमीन खरेदी करण्यासाठी जमवण्यात आलेला पैसा खोट्या कंपन्याच्या नावांनी जमा करण्यात आला आहे हे तपासात निष्पन्न झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button