breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्तेसाठी भाजपच्या नाराज निष्ठावंतांचे मनोमिलन; नवख्यांची वाढली चिंता

  • भाजपच्या 300 कार्यकर्त्यांना घडविली अलिबागची सफर
  • पदांबाबतचे अतिक्रमण मोडीत काढण्याचा केला निर्धार

अमोल शित्रे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे कोमेजलेले कमळ खांद्यावर घेऊन मोठ्या कष्टाने राजकीय चड-उतार पार केले, म्हणून आज पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची सत्ता आली. मात्र, सत्तेची फळे चाखताना पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने आपला विचार केला नाही, या नैराश्यातून पक्षासाठी “जीव की प्राण” करणारे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते विखुरले गेले होते. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्यात “समझौता” घडवून आणण्यासाठी भाजपच्या एका माजी नगरसेवकाने शहरातील 300 कार्यकर्त्यांना अलिबागची सफर घडविली आहे. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी पालिकेतील हक्काच्या पदांवर अतिक्रमण करणा-यांना धडा शिकविण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याचा निर्धार केल्याचे समजते. त्यामुळे सत्तेच्या लालसेपोटी ऐनवेळी भाजपत दाखल झालेल्यांना हा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर महत्वाच्या पदांवर पक्षातील निष्ठावंतांचा हक्क होता. मात्र, त्यांचा निभाव कुठेच लागला नाही. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाल्याची खदखद त्यांच्या मनात होत आहे. आपल्या हक्कांच्या पदांवर बाहेरून पक्षात आलेल्या लोकांनी अतिक्रमण केल्याची भावना त्यांच्या मनाला भेडसावत आहे. त्यामुळे पालिकेवर सत्ता येऊनही पक्षातील निष्ठावंत हिरमुसले आहेत. नाराज होऊन पक्षाचे काम केवळ नावापुरते करण्याची भूमिका ते पार पडत आहेत. अतिक्रमणीत पदांबाबतचा न्याय मागायचा तरी कोणाकडे असा प्रश्न त्यांना पडला होता. या नैराश्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक राजू दुर्गे यांनी जवळपास 300 निष्ठावंतांची एकजूट तयार केली. त्यासाठी दुर्गे यांनी या 300 कार्याकर्त्यांना अलिबागची सफर घडविली आहे. या कार्यकर्त्यांची तेथील शांत वातावरणात बैठक घेऊन पक्षाच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यावेळी पालिकेतील महत्वाच्या पदांवर अतिक्रमण केल्याबाबत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचेही सांगण्यात आले.

याबाबत आपण कोणाकडेही दाद मागू शकत नाही. आपण आपल्या खांद्यावर पक्षाचे कमळ आजपर्यंत पेलत आणले म्हणून आज पिंपरी-चिंचवड महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली. पालिकेतील महत्वाच्या पदांवर अतिक्रमण झाले हे मान्य असले तरी आगामी कार्यकाळात या पदांचा उपयोग करून घ्यायचा असेल, तर केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असले पाहिजेत, आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असले पाहिजेत. राजसत्तेची सुत्रे या दोघांच्या हातात पुन्हा एकदा सोपविली की, आपल्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेवर पुन्हा भाजपची सत्ता येऊन महत्वाच्या पदांवर लोकांची कामे करण्याची संधी मिळेल. त्यासाठी विखुरलेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी दूर ठेवून पक्षासाठी, मोदींसाठी, फडणवीस यांच्यासाठी आपण एकदिलाने काम करण्याची गरज आहे, अशी विनवणी दुर्गे यांनी केल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता मनोमिलन झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील भाजप नेत्यांना आणि पदाधिका-यांना ही धोक्याची घंटा मानली जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर पाहता या एकजुटीची शिकार कोण ठरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आगामी काळात केंद्रात आणि राज्यात भाजपच
या दौ-यामुळे मरगळ झटकून भाजपचे निष्ठावंत कामाला लागले आहेत. 300 लोकांचा या दौ-यात समावेश होता. कोणी म्हणते ही सहल होती. कोणी म्हणते कार्यकर्त्यांची एकजूट तयार करण्यासाठीची बैठक होती, अशी माहिती सांगितली जात आहे. प्रत्यक्षात दोन खासगी बसेस करून हे कार्यकर्ते अलिबागला गेले होते. त्याठिकाणी बैठक घेऊन दुर्गे यांनी सर्वांना समजून सांगितल्याचे समजते. एक कार्यकर्ता 100 कार्यकर्त्यांच्या समसमान आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता येणार, यात किंचितही संशय नाही, असा आत्मविश्वास कार्यकर्त्यांमध्ये वाढविल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button