breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनाच्या जागरुकतेबद्दल मुंबई पोलिसांची भन्नाट शक्कल,मास्क घातलेल्या राजकुमारीचा फोटो केला पोस्ट…

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर्स, पोलीस, नर्सेस अहोरात्र मेहनत घेताहेत. अशातच कोरोनाला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर करणे तसंच सोशल डिस्टन्सिंग ठेवणं हे महत्त्वाचं आहे. तसंच कोरोना व्हायरसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई पोलिस नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आणखी एक भन्नाट फोटो शेअर केला आहे. हॉलिवूड चित्रपटांमधील कल्पना घेऊन मुंबई पोलिसांनी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टचं सर्वत्र कौतुकही होत आहे…

आपण परीकथांचे चाहते असाल तर, स्नो व्हाइट आणि सेव्हन ड्वार्फ्स या प्रसिद्ध डिस्ने चित्रपटातील,  Mirror, Mirror on the wall, who is the….?” ही लाईन तुम्ही नक्की ऐकल असाल. मुंबई पोलिसांनी त्यांच्या लेटेस्ट पोस्टमध्ये या लाईनच्या आधारे फोटो शेअर करुन असाच प्रश्न विचारला आहे. 

पोलिस विभागाने -एक फोटो शेअर केला आहे. ज्यात जादूई आरशात मास्क घातलेल्या राजकुमारी स्नो व्हाइटचे प्रतिबिंब दिसत आहे. पोलिसांनी हा फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिलं की, भिंतीवरील आरसा-आरसा, या सर्वांमध्ये सर्वात सुरक्षित कोण आहे? ” (Mirror-Mirror on the wall, Who is the safest of them all?)

तसंच या पोस्टसोबत पोलिसांनी हॅगटॅगचाही वापर केला आहे. #SnowWhiteAndHerSevenMasks असा हॅगटॅगही वापरण्यात आला आहे. शेअर केलेल्या या पोस्टला आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लाईक्स मिळालेत. या पोस्टवर नेटीझन्सनी पोलिस विभागाच्या सर्जनशीलतेचे कौतुक केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button