breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार लांडगे गटाकडून भाजपवरच ‘दबाव तंत्र’

  • पत्रकार परिषद घेऊन नगरसेवकांनी दिली माहिती
  • भोसरीला एकही पद मिळाले नसल्याची दिली कबुली

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सलग दोन वेळा महापौर, शिक्षण समिती, क्रिडा समिती, महिला व बाल कल्याण समिती आणि शहर सुधारणा समिती सभापती पद भोसरी मतदार संघातील मातब्बर नगरसेवकांकडे ठेवले आहे. तरी, पुन्हा स्थायी समितीचे सभापती पद आजमावण्यासाठी आमदार महेश लांडगे समर्थकांनी महापालिकेत दबाव गट निर्माण केला आहे. संतोष लोंढे यांना सभापती पद मिळावे, यासाठी एकजूट केली आहे. तथापि, भाजपचे खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात येणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

महापौर राहूल जाधव यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन भोसरीच्या नगरसेवकांनी आज ही माहिती दिली. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, ‘इ’ प्रभागाच्या सभापती भीमाबाई फुगे, नगरसेवक संतोष लोंढे, विकास डोळस, लक्ष्मण उंडे, नितीन लांडगे, सागर गवळी उपस्थित होते.

  • आमदार महेश लांडगे यांचे समर्थक असले तरी दोनवेळा महापौर हे पद समाविष्ट गावाला मिळाले. वास्तविक भोसरीला एकही पद मिळाले नाही. उलट चिंचवड मतदार संघाला म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाला सलग दोनवेळा स्थायी समिती सभापती पद मिळाले आहे. यावर्षी तिस-या स्थायी समितीचे सभापती पद भोसरीला मिळावे, अशी अपेक्षा लांडगे गटाची आहे. संतोष लोंढे यांना स्थायी समिती सभापती पद देण्यात यावे, अशी आमची आग्रही मागणी आहे, असे महापौर राहूल जाधव यांनी सांगितले.

भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची भेट घेऊन भोसरीलाच स्थायी समिती द्यावी, अशी विनंती केली जाणार आहे. राज्यसभेचे खासदार अमर साबळे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची देखील भेट घेणार आहोत. पक्ष योग्य निर्णय घेईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. पक्षाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील, असे महापौर जाधव यांनी सांगितले.

कोणी कितीही दबाव गट तयार केला तर भाजपवर परिणाम पडणार नाही. स्थायी समिती सभापती पदावर योग्य व्यक्तीला न्याय मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार सभापती पदाची निवड होईल.

एकनाथ पवार, सत्तारुढ पक्षनेते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button