breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

न्यायहक्कासाठी पिंपरी-चिंचवडमधील सफाई कामगार रस्त्यावर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यातील साफ सफाई कामगारांचे पाय धुऊन त्यांचे पूजन केले. याचा आदर्श घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांचे प्रश्न सोडवावेत, असे आव्हान कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

कष्टकरी कामगार पंचायत वतीने कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या साफसफाई कामगार महिलांचा मोर्चा पिंपरी-चिंचवड महापालिकेवर काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आज दुपारी तीन वाजता महात्मा फुले येथील पुतळ्यापासून महापालिकेच्या गेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी सफाई कामगार  महासंघाचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे, कष्टकरी कामगार पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, शहराध्यक्ष संभाजी गोरे, अमर जयस्वाल, सविता लोंढे, माया कांबळे, रेणुका तोडकर, मंगल जाधव, अनिता सोनवणे, आशा पठारे, मंगल कसबे, कविता लोखंडे, सविता घाडगे, शरद पवार आदी उपस्थित होते.

कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे. त्यांना सामान आणि किमान वेतन मिळावे. फंड मिळावा, पंतप्रधान आवास योजनेमध्ये सफाई कामगार महिलांना प्राधान्य देण्यात यावे. यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साफसफाई कामगारांची पूजा करतात आणि त्यांच्याच पक्षाशी सत्ता असलेल्या महापालिकेत मात्र त्यांची पिळवणूक केली जात आहे. हा विरोधाभास असून पंतप्रधान यांची कृती प्रत्यक्षात उतरली पाहिजे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button