breaking-newsमुंबई

आमदार रोहित पवार यांनी कर्जत शहरातील प्रतिबंधक क्षेत्रांची केली पाहणी

कर्जत : कर्जत शहरातील प्रतिबंधक क्षेत्रांमध्ये जाऊन आमदार रोहित पवार यांनी पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. कर्जत शहरामध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नगरपंचायत सह सर्व परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करून सील करण्यात आला. या परिसराची आज आमदार रोहित पवार यांनी समक्ष भेट देऊन पाहणी केली. याचप्रमाणे त्यांनी या परिसरातील नागरिकांशी संवाद साधताना; घाबरून जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या. आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अडचण असेल तर मला नक्कीच सांगावे.

तसेच घरात राहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन यावेळी पवार यांनी नागरिकांना केले. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, रवींद्र सुपेकर, नामदेव थोरात, वैभव शहा, भास्कर भैलुमे हे उपस्थित होते. कर्जत शहरात 27 तारखेपर्यंत कर्फ्यु लावण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप कर्जत शहरातील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केलेल्या गवंडी गल्ली या परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत याच प्रमाणे मुंजोबा मित्र मंडळ व भाजपच्या नगरसेविका राखी शहा यांच्या वतीने नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button