breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

अमरावतीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आंदोलन

अमरावती : काही दिवसांपूर्वी अमरावतीच्या पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजस्थान सरकारच्या मुद्द्यावरून भाजपवर प्रहार करत ‘शेणातले किडे’ असा शब्द प्रयोग मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केला होता.

त्यामुळे आज अमरावतीच्या राजकमल चौकात भाजपा महिला आघाडी तर्फे यशोमती ठाकूर यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या महिलांनी जोरदार निदर्शने करत संतप्त महिलांनी यशोमती ठाकूर यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी केली.

यशोमती ठाकूर या काँग्रेस पक्षाच्या राज्याच्या कार्यकारी अध्यक्ष सुद्धा आहे, मध्यप्रदेश कर्नाटक आणि आता राजस्थान येथील सरकार काँग्रेसकडून जाण्याच्या मार्गावर असल्याने विनाकारण यशोमती ठाकूर राजस्थान सरकार वरून, भारतीय जनता पार्टीला टारगेट करत असल्याचा आरोप भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी केला, त्यामुळे भाजपचे आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत तसेच सत्तेसाठी भाजप आकसलेली आहेत. त्यामुळे शेणातल्या किड्याप्रमाने भाजपा वळवळ करत आहे, असे वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी भाजप विरोधात केले होते त्याला भाजपाच्या महिलांनी चोख प्रत्युत्तर आहे दिले त्यामुळे आगामी काळात यशोमती ठाकुर विरुद्ध भाजप असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button