breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुलगा ‘पार्थ’साठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उतरले मैदानात

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले. त्यानंतर या मतदार संघातून मुलगा पार्थच्या विजयासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. पनवेलमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. 

मावळची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी स्वतंत्रपणे ख-याअर्थाने आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे स्वताः अजित पवारही कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मुलासाठी जोर लावताना दिसत आहेत.

सध्या  शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत मावळवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी हा मतदारसंघ अधिक चर्चेत आला तो राष्ट्रवादीच्या खेळीने. कारण, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची मावळमधून राजकारणात एॅट्रीने श्रीगणेशा होणार आहे. तसेच पार्थ यांची याच मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी चर्चा होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचं सांगितल्याने पार्थ मावळमधून लढतील, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान, मावळमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरोधात राष्ट्रवादीकडे कोणताही तुल्यबळ स्थानिक उमेदवार नव्हता. राष्ट्रवादीने स्थानिक चेहरा दिला असता तरीही तो चालेल याची खात्री नव्हती. मावळ मतदार संघात अजित पवारांना मानणारा वेगळा गट आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवाराची विशेष ताकद आहे. त्यामुळे आधीच उमेदवाराची असलेली कमतरता आणि त्यातच अजित पवार यांचे पुत्र म्हणून पार्थ पवार यांच्यामागे उभे राहणारी कार्यकर्त्यांची ताकद, या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी चर्चेत आली. आता पार्थला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी स्वताः कंबर कसली असून पनवेलमधून कार्यकर्त्यांच्या बैठकीला प्रारंभ करीत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button