breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘आमदार रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, अभ्यास करुन बोलावं’, फडणवीसांचा सल्ला

सातारा: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एलबीटीवरुन भाजपवर केलेल्या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला आहे. कराडच्या कृष्णा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावरही निशाणा साधलेला आहे.

“रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. नीट अभ्यास केला पाहिजे आणि मंग बोललं पाहिजे. महाराष्ट्रात एलबीटी जरी असतं तरी आपल्याला पैसे मिळाले नसते. नुकसान झालं, तोटा झाल्याचे बोलून काहीतरी आकडे सांगायचे, असं न करता नीट अभ्यास करुन बोललं पाहिजे”, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button