breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाल्हेकरवाडी रोटरी क्लबच्या वतीने देवांग जानी यांना यंदाचा “पाणीदार माणूस पुरस्कार” जाहीर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पवनामाईच्या स्वच्छतेसाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने जलपर्णी मुक्त सांडपाणी विरहित स्वच्छ संदर पवनामाई अभियान राबविण्यात येत आहे. याला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असून संस्थेचे कार्य एका ठरावीक उंचीवर पोहोचले आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष रो. अॅड. सोमनाथ हारपुडे आणि रो. प्रदीप वाल्हेकर यांनी दिली.

हे कार्य ५ नोव्हेंबर २०१७ रोजी सुरू झाले. लोकसहभाग आणि रोटरी क्लब आफ वाल्हेकरवाडी यांचे सातत्यपर्ण काम सुरू आहे. आजअखेर १०४ संस्थांच्या साथीने पवना नदीच्या प्रदूषणाबाबत वारंवार आवाज उठवत आतापर्यंत प्लास्टिक बंदी, सांडपाण्याने नदीची होणारी दरवस्थेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या तंत्रशुद्ध कामाने काही प्रमाणात जलपर्णीचे प्रमाण कमी झाले आहे.

जीवनदायिनी पवना नदी स्वच्छ संदर पवनामाई खळाळती रहावी, नागरिकांनी नदीवर यावे नदीची व्यथा जाणून घ्यावी, यासाठी गेले ३ वर्षे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून “पवनामाई महोत्सव आयोजित केला आहे.

यात संदीप खरे व सलील कुलकर्णी आयुष्यावर बोलू काही हा बहारदार कार्यक्रम आयोजित केला असून सदर कार्यक्रम महासाधू मोरया गोसावी समाधी परिसर, देऊळमळा, चिंचवड येथे होणार आहे. याचबरोबर नदीचे महात्म्य सांगणारे सादरीकरण संस्कार भारती पिंपरी-चिंचवड यांचे वतीने नृत्याच्या माध्यमातून सादर होणार आहे. याचबरोबर रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या माध्यमातून दरवर्षी पाण्याच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तीचा पाणीदार माणूस पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.

याही वर्षी नाशिक येथील गोदावरी नदीचे संवर्धन व पुरातन प्राचीन कडाचे सिमेंटीकरण याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून यशस्वी लढा दिलेल्या या प्राचीन कुंडाचे पुनर्जीवन करणाऱ्या नाशिक येथील नदी प्रेमी देवांग जानी यांना या वर्षीचा “पाणीदार माणूस पुरस्कार २०२० दिला जाणार आहे. तरी, सर्व नदी प्रेमी, निसर्गप्रेमी यांनी नदीबाबत आत्मीयता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरीचे प्रेसिडेंट ऍड. सोमनाथ हारपडे व संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव चाल्हेकर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button