breaking-newsमुंबई

आमदार अबू आझमींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा यांना अपशब्द बोलल्याबाबत मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणणे,  मास्क न घालणे असे अनेक आरोप अबू आझमी यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनवर दोन दिवसांपूर्वी म्हणजे 27 मे रोजी इतर राज्यातील काही गाड्या सोडण्यात येणार होत्या. मात्र रेल्वे प्रशासनाने गाड्यांविषयी कोणतीही माहिती न दिल्याने हजारो मजूर सीएसटी स्टेशनजवळ जमले होते. त्या स्टेशनबाहेर वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी शालिनी शर्मा यांची ड्युटी होती.

शालिनी शर्मा या सर्व मजुरांना रेल्वे प्रशासनाने दिलेली माहिती सांगत होत्या. यात कोणती ट्रेन नेमकी कधी सुटेल याबाबतची माहिती त्यांनी मजुरांना दिली. तोपर्यंत आत कोणालाही सोडता येणार नाही. तर काही ट्रेन रद्द झाल्याने मजुरांना घरी जा, असेही त्यांनी सांगितले.

मात्र त्याच वेळेस त्या ठिकाणी आमदार अबू आझमी दाखल झाले. त्यांनी शालिनी शर्मा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी मजुरांसमोर भाषणही केलं. यामुळे काही मजुरांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

दरम्यान यावेळी आझमी यांनी मास्कही घातला नव्हता. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आमदार अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button