breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराष्ट्रिय

Pakistani Drone : पाकिस्तानचे दोन ड्रोन जप्त, BSF ची कारवाई

Pakistani Drone : पंजाबमधील अमृतसरमध्ये पाकिस्तानी तस्करांचे 2 प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (BSF) असफल करण्यात यश मिळवले आहे. काल (19 मे) एकाच रात्रीमध्ये पाकिस्तानचे दोन ड्रोन बीएसएफकफून पाडण्यात आले आहे. हे दोन्ही ड्रोन एकाच प्रकारचे आहेत.

प्राप्त माहीतीनुसार, बीएसएफला हे दोन्ही ड्रोन अमृतसर सेक्टर अंतर्गत येणाऱ्या धारिवाल आणि रत्ना खुर्द भागामध्ये आढळले आहेत. ड्रोनने काही वस्तू कुठेतरी पोहोचवण्याचा संशय व्यक्त झाला असता परिसरात शोधकार्य सुरू करण्यात आले, त्यावेळी बीएसएफच्या जवानांनी ड्रोनमधून होणाऱ्या हेरॉइनची खेपही जप्त केली आहे.

हेही वाचा – ‘गड-किल्ल्यांवर दर्गे आहेत ते हटवले गेलेच पाहिजेत’; राज ठाकरे आक्रमक

बीएसएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8.55 वाजता पहिला ड्रोन उधर धारिवाल गावाजवळ तर दुसरा ड्रोन रत्ना खुर्दजवळ 9.55 वाजेनंतर सापडला आहे. बीएसएफ जवानांनी ड्रोनच्या आवाजाच्या दिशेकडे गोळीबार केल्यावर ड्रोनचा आवाज बंद झाला आणि शोधल्यानंतर हवं दोन्ही ड्रोन सापडले.

रत्ना खुर्द परिसरात सोडलेल्या ड्रोनमधून 2 किलो हेरॉईनची खेपही जप्त केली. त्या जप्त केलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय किंमत 15 कोटी रुपये असल्याचं समजत आहे. दोन्ही ड्रोन हे Quadcopter DJI मॅट्रिक्स 300 RTK आहे. जे पाकिस्तानी तस्कर सीमेपलीकडून लहान आणि कमी वजनाची खेप मिळवण्यासाठी वापरतात. हे ड्रोन एका खेपेला 3 ते 5 किलो वजन उचलू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button