क्रिडाताज्या घडामोडीपुणे

वर्ल्डकपसाठी टीम जाहीर होताच अफगाणिस्तानच्या राशिद खानने सोडलं कर्णधारपद

पुणे | अफगाणिस्तानमध्ये सध्या तालिबानी राजवट लागू करण्यात आली आहे. तालिबान्यांनी आपलं सरकार देखील स्थापन केलं आहे. मात्र, याचा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आगामी T20 वर्ल्डकपसाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने राशिद खानच्या नेतृत्वाखाली संघाची घोषणा केली पण, संघाची घोषणा करताच कर्णधार राशिद खानने कर्णधारपद सोडलं आहे.

राशिद खानने आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. राशिद खानने आरोप केला आहे की अफगाणिस्तान क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेसाठी संघाची निवड केली त्या बैठकीला आपल्याला बोलवण्यात आलं नव्हतं, असं त्यानं आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटले आहे.

राशिद खानने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘कर्णधार आणि देशाचा जबाबदार नागरिक म्हणून मला संघाची निवड करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार होता. निवड समिती आणि एसीबीने संघाची घोषणा करण्याआधी माझा सल्ला घेतला नाही. म्हणून मी आता या क्षणापासून अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद सोडत आहे. अफगाणिस्तानसाठी खेळता आलं याचा मला कायम अभिमान राहील,’ असं म्हटलं आहे.

दरम्यान, तालिबानच्या राजवटीत महिलांना क्रिकेटसाठी परवानगी दिली नाही, तर पुढील महिन्यात अफगाणिस्तानच्या पुरुष संघाशी कसोटी सामना खेळणार नाही, असा इशारा ‘क्रिकेट ऑस्ट्रलिया’ने दिला आहे.

असा आहे अफगाणिस्तानचा संघ

राशिद खान, रहमनुल्लाह गुरबाज, हजरतुल्लाह जजाई, उस्मान घानी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जन्नत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हामिद हसन, शराफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शपूर जादरान आणि कायस अहमद

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button