breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; कामगारांची दुचाकी रॅली

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी प्रणित केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशातील विविध कामगार संघटनांनी आज (बुधवारी) भारत बंद पुकारला आहे. त्याला उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमधील कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कामगारांनी दुचाकी रॅली काढली. पिंपरीतून कामगार वाकडेवाडी येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडकले.

कंत्राटीकरण, जनविरोधी खासगीकरण रद्द करण्यासाठी, सार्वत्रिक सामाजिक संरक्षणेच्या हक्कासाठी माथाडी व बांधकाम असघंटीत कामगारांच्या सक्षमींकरणासाठी कामगारांनी अखिल भारतीय संप पुकारला आहे. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून दुचाकी रॅली मार्गस्थ झाली.

 भारतीय कामगार सेना महासंघाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे कामगार नेते इरफान सय्यद, इंटक, कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष कैलास कदम, श्रमिक एकता महासंघाचे दिलीप पवार, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले यांच्यासह महाराष्ट्र मजदूर संघटनेचे सल्लागार बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष परेश मोरे, उपाध्यक्ष खंडू गवळी, जन.सेक्रेटरी प्रवीण जाधव, सर्जेराव कचरे सहभागी झाले आहेत.  यामध्ये महाराष्ट्र राज्य सर्वश्रमिक संघ, हिंद कामगार संघटना, विमा, बँका, संरक्षण, पोस्ट, बीएसएनएल, राष्ट्रवादी कामगार सेल, वीज मंडळ, आरोग्य कर्मचारी रेल्वे, अंगणवाडी, आशा इत्यादी हजारो कामगार भारत बंद मध्ये सहभागी झाल्याचे कामगार  नेत्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button