breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार गणपतराव देशमुख यंदा निवडणूक लढवणार नाहीत, नवीन चे-याला संधी देणार

सांगोला –  महाराष्ट्र विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आणि तब्बल ५५ वर्षे सांगोला मतदारसंघाचे आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार आहेत. प्राकृतीक कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.

सांगोला मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला असल्याने पक्षातील नव्या चेहऱ्याला संधी देणार असल्याचे गणपतराव देशमुख यांनी स्पष्ट केले. सांगोल्याचा दुष्काळ हटवण्यासाठी टेंभु म्हैसाळ सहअनेक योजनांचे पाणी आणण्यात आपल्याला यश आले असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

गणपतराव देशमुख यांनी १९६२ साली पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर आजवर १२ निवडणुकांमध्ये विजय मिळवला. देशमुख यांना आपल्या संसदीय राजकारणाच्या कारकिर्दीत केवळ १९७२ आणि १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. त्यापैकी १९७२ साली झालेल्या पराभवानंतर १९७४ च्या पोटनिवडणुकीत पुन्हा विजयी झाले होते. प्रदिर्घ कारकिर्द असलेले गणपतराव देशमुख आता आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याने शेकापमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

सत्तेसाठी पक्षांतर
सध्या सुरु असलेल्या पक्षबदलावर गणपतराव देशमुख यांनी हे सत्तेसाठी पक्षबदल सुरू असल्याची टीका केली. असे पक्ष बदल करणारे कायमस्वरूपी राहत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button