breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

समाजाच्या प्रगतीसाठी सक्षम अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज – अमित गोरखे

  • अमित गोरखे यांचे महामंडळाच्या प्रशिक्षण शिबिरात प्रतिपादन

पुणे, (महाईन्यूज) – समाजाला प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर त्यासाठी सक्षम अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज आहे. महामंडळातील कामामध्ये गतीमानता आणण्यासाठी ऑनलाईन कामकाज सुरू केले जाईल. तसेच काम करीत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आत्मविश्वास वाढविणे अवश्यक आहे, असे प्रतिपादन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई आयोजित पुणे येथील यशवंराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) येथे अधिकारी व कर्मचारी कार्यशाळा पार पाडली. कार्यशाळेचे उदघाटन महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करुन महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांच्या हस्ते झाले. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत बगाडे, महामंडळाचे महाव्यवस्थापक डी. एम. झोंबाडे, महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के, जगदिश गाबणे, के. के. गायकवाड, आर.बी. रंधवे,  सर्व जिल्हा व्यवस्थापक तसेच कर्मचारी उपस्थीत होते.

व्यवस्थापकीय संचालक विक्रांत बगाडे म्हणाले, यांनी कर्मचाऱ्यांनी कामकाजात सुसुत्रीतपणा, कार्य तत्परता  आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर  तज्ञ व्याख्याते यशदा पॅनल रेवणकर यांचे कार्यालयीन कामाकाजात गतीमानता आणणे व प्रेरणादायी व्याखान झाले. दुपारच्या सत्रात मुकुंद नाडगौडा, पुणे यांचे संगीतातुन ताणतणाव व्यवस्थापन या विषयी व्याखान झाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपमहाव्यवस्थापक, नारोळे यांनी केले व आभार जिल्हा व्यवस्थापक एस. एल. मांजरे यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button