breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदारांच्या घराजवळच कच-याचे साम्राज्य; हेच का भाजपचे अच्छे दिन

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा आरोप

पिंपरी – सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छतेची सवय लावण्यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता हाती असलेल्या भाजपने स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविले. मात्र, या अभियानालाही लाजवेल असे विदारक चित्र भोसरी विधानसभा मतदार संघात निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजप आमदारांच्या घरापासून काही अंतरावर कचरा कुंड्या अक्षरषः भरून वाहत आहेत. आमदारांच्या घर परिसरातील अशी अवस्था असेल तर संपूर्ण भोसरी मतदार संघाचे काय हाल असतील?, असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी उपस्थित केला आहे.

 

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील खासदार, आमदार, नगरसेवक आदींनी शहराच्या विविध भागात स्वच्छता अभियान घेतले. त्याला नागरिकांचा प्रतिसादही मिळाला. दरम्यान, नागरिकांत स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीही करण्यात आली. तरीही, भोसरी विधानसभा मतदार संघाचे चित्र काही बदलताना दिसत नाही, असा आरोप दत्ता साने यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यातून आरोग्याची काळजी घेण्याचा संदेशही नागरिकांना देण्यात आला आहे.

 

भोसरी विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदारांच्या घरापासून काही अंतरावर लांडेवाडी टेल्को रस्ता या ठिकाणी रस्त्याच्या कडेला ठेवलेली कचार कुंडी ओव्हर फ्लो झालेली आहे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून मलेरिया, डेंग्यू, हिवताप अशा आजारांना निमंत्रण देणारी स्थिती निर्माण झाली आहे. आमदारांचे याकडे बिलकूल लक्ष दिसत नाही. त्यामुळे मतदार संघाची अशी वाट लागल्याचे पहायला मिळत आहे. आमदारांच्या घराजवळची अशी स्थिती असेल तर संपूर्ण मतदार संघाची काय अवस्था असेल?, असा प्रश्न साने यांनी उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button