breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Lockdown: ‘लॉकडाउन’मध्ये दिलासादायक वृत्त, देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने केली ‘ही’ घोषणा

‘लॉकडाउन’दरम्यान देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी दिलासादायक वृत्त आलं आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या गाड्यांचं उत्पादन पुन्हा सुरू करणार आहे. कंपनी हरयाणाच्या मानेसर येथील कारखान्यामध्ये प्रोडक्शन घेण्यास पुन्हा सुरूवात करणार आहे.

बुधवारी याबाबत मारुती सुझुकीकडून माहिती देण्यात आली. यापूर्वी 22 एप्रिल रोजीच हरयाणा सरकारने काही निर्बंधांसह मारुतीला मानेसर कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण, त्यावेळी कंपनीने नकार दिला होता. मात्र, आता सरकारने सांगितलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 12 मे पासून मानेसर कारखान्यातील प्रोडक्शन घेण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती मारुती सुझुकीने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button