breaking-newsमुंबई

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 13 हजारांवर

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 1 लाखाच्या पार गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. आज दिवसभरात तब्बल 2 हजार 701 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 1 लाख 13 हजार 445 वर पोहोचली आहे.

राज्यात आतापर्यंत 57 हजार 851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 50 हजार 44 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील कोरोनाबळींची संख्या 5,537 वर

राज्यात आज दिवसभरात 81 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 5 हजार 537 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 1 हजार 802 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत राज्यातील 57 हजार 851 जण कोरोनामुक्त झाले आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button