breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

आधी पाकिस्तानच्या जवानांना झोडपलं, आता पुन्हा झापलं, चीन-पाकिस्तानच्या दोस्तीत कुस्ती सुरुच

लाहोर | पाकिस्तानात सुरु असलेल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प परिसरात चिनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरुन चीनने पाकिस्तानला प्रचंड झापलं आहे. खरंतर पाकिस्तानात जाऊन चिनी कर्मचारी आणि सैनिक पाकिस्तानच्या सैनिकांशी हुज्जत घालतात, तेथील स्थानिक कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. मात्र, तरीदेखील चीनने चिनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरुन पाकिस्तानला प्रचंड सुनावलं आहे.

पाकिस्तानात कारोट हायड्रोपावर प्रोजेक्ट, आजाद पट्टन प्रोजेक्ट सुरु असलेल्या भागात हवी तशी चिनी कर्मचाऱ्यांना पाकिस्तानकडून सुरक्षा दिली जात नाही, असं चीनचं म्हणणं आहे. सुरक्षेच्या अभावासह कामातही गती नाही. त्यामुळे चीन नाराज असल्याची माहिती मिळत आहे. चीनकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पाकिस्तानकडून पालन होत नसल्याने चीन पाकिस्तानवर प्रचंड भडकला आहे.

चीनच्या ओरडण्यावर पाकिस्तान काहीच बोललेला नाही. चीनकडून घेतलेल्या कर्जाच्या दडपणाखाली पाकिस्तानी सरकार मूग गिळून गप्प बसलं आहे. मात्र, पाकिस्तानी सरकारच्या या शांततेमुळे पाकिस्तानी सैनिकांचे मनौधैर्य खालावले आहे. त्यामुळे या सैनिकांनी रागात बंडाचं हत्यार उपसलं तर पाकिस्तानी सरकारला प्रचंड महागात पडू शकतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button