breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर यशस्वी मात, चाचणी अहवाल आला निगेटीव्ह

नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोनार यशस्वी मात केली आहे. त्यांनीच याबाबतीत आज ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यांची आज कोरोना चाचणी झाली. या चाचणीत त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या अगदी दोनच दिवसांपूर्वी अमित शहा यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. दरम्यान, भाजप नेते मनोज तिवारी यांनी केलेल्या ट्विटमुळे मध्यंतरी संभ्रमही निर्माण झाला होता.

मात्र, आज खुद्द अमित शहा यांनी ट्विट करत कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी सर्वांचे आभार मानले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते काही दिवस होम क्वारंटाइन राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button