breaking-newsपुणेमहाराष्ट्र

आधी खराब रस्त्यांमुळे उशीर व्हायचा आता विकासकामांमुळे उशीर होतो – पंकजा मुंडे

शहरातील विकास कामांमुळे कार्यक्रमाला येण्यासाठी उशीर होतोय अशा शब्दांमध्ये ग्रामविकास व महिला बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी  उशिरा पोहोचण्याचा अनुभव आनंदाने सांगून सरकार विकासकामे करीत असल्याचे संकेत दिले.  त्या स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ६९ व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात आठवणीतील मुंडे साहेब या कार्यक्रमात बोलत होत्या. आधी खराब रस्ते असल्याने उशीर व्हायचा पण आता विकासकामांमुळे उशीर होत आहे. सध्या महाराष्ट्रात विकास कामं सुरू आहेत. रस्ते,मेट्रो,पूल यांचं काम सुरू आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला यायला उशीर झाला असं त्या म्हणाल्या.

यावेळी राज्यमंत्री महादेव जानकर,महापौर राहुल जाधव,भाजपा शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप,पक्षनेते एकनाथ पवार,नव नगर विकास प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे,सचिन पटवर्धन,पोलीस आयुक्त आर.के पदमनाभन आदी उपस्थित होते.यावेळी भक्तीशक्तीचे शिल्प देऊन राज्य मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वागत करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ‘आठवणीतील मुंडे साहेब’ हा कार्यक्रम मुंडे यांच्या ६९ व्या जयंती निमित्त ठेवण्यात आला होता. परंतु राज्य मंत्री पंकजा मुंडे या नेहमीप्रमाणे दोन तास उशिरा आल्या. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी उशीर झाल्याची कबुली दिली आणि त्यासाठी विकास कामं जबाबदार असल्याचं म्हणाल्या. त्या म्हणाल्या की,पुण्यामध्ये विकास कामं सुरू आहेत.  मुंडे साहेबांना कार्यक्रमांसाठी नेहमी उशीर व्हायचा, मलाही होतो तरी देखील लोकं वाट पाहतात. मुंडे साहेब सकाळी आठच्या सुमारास घरातून निघत परंतु त्यांना रस्त्यात लोक भेटायची त्यामुळे त्यांना कार्यक्रमांना उशीर व्हायचा. मीही लोकांना भेटल्यामुळे उशीर होतो. त्यात आणखी एक कारण म्हणजे रस्ते खराब असायचे, परंतु आता मात्र कामाच्या विकासामुळे उशीर होत आहे. महाराष्ट्रात रस्ते,मेट्रो आणि पुलाचे जाळे उभारले जात आहे, असं म्हणत त्यांनी सरकार विकासकामे करीत असल्याचे संकेत दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button